fbpx

पण… का?

ती कमावते त्याच्या बरोबरीने
‘लक्ष्मी’ होऊन
ती शिकवते तिच्या मुलांना
‘सरस्वती’ होऊन
ती तृप्त करते घरच्यांना
‘अन्नपूर्णा’ होऊन
ती धडा शिकवते समाज कंटकांना
‘काली’ होऊन
तरीही तिचं शोषण केलं जातं
तिच्याच ‘नारायणा’ कडून
आणि ती हे गुपचूप सहन करते
साधीसुधी ‘अबला’ बनून
पण कां?
उत्तर तिनेच द्यायचंय
स्वत:ला विचारून.

कवयित्री ज्योती कपिले

One Reply to “पण… का?”

Leave a Reply

Your email address will not be published.