fbpx

चॉकलेटच्या यशस्वी रुचिका : सौ वर्षा दिलीप मालप

माहेरी  असताना  कुणालाही व्यवसायाचा गंधही नव्हता, पण वाढत्या आर्थिक गरजेतून उद्योगाचे दरवाजे उघडले गेले आणि हातातली कला आणि बोलण्यातला गोडवा या दोन गोष्टींच्या भांडवलावर त्यांनी चॉकलेटचा उद्योग करत मुंबई सारख्या महानगरात आपले उद्योजिकत्व सिद्ध केले त्या वर्षा  दिलीप मालप यांच्याविषयी….

वर्षाताई लहान वयातच शालेय शिक्षण बारावीला सोडून सासरच्या छायेत आल्या. दोन्ही घरांत उद्योग-व्यवसाय याचा गंध नव्हता. आर्थिक सुबत्ताही फारशी नव्हती. मात्र या गोष्टी त्यांच्या उत्कर्षांच्या आड कधीच आल्या नाहीत.परंतु  चॉकलेट व्यवसायातील प्रवास त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करतो.

अर्थातच वर्षाताई यांचा हा प्रवास सहज नक्कीच नव्हता. अनेक कर्तबगार स्त्रियांचे यशस्वी जीवन ऐकून, पाहून त्यांनाही आपण काही तरी करायला हवे असे वाटत होते. त्यासाठी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर बारावीपर्यंतच शिक्षण झालेल्या वर्षाताईंनी लग्नानंतर वाढत्या  महागाईला तोंड देण्यासाठी उद्योगाला  माहेरी असतानाच सुरुवात केली होती. अर्थात माहेरची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. उद्योगासाठी भांडवल आणणार कुठून? त्यावर त्यांनी उपयोगात आणली ती आपल्या हातातली कला,आवड आणि सतत काही नवीन करण्याची इच्छा आणि पतीने पुढे हो दिलेला संदेश हा अनुभव इतका प्रोत्साहन देणारा, आत्मविश्वास वाढवणारा होता की, हा हा म्हणता उद्योग उत्तम नावाजला जाऊ लागला. 

ग्राहकराजाच खरा सखा मानल्याने प्रेमाचे बंध-अनुबंध बांधले. घरातल्या या अनेक जबाबदाऱ्यांबरोबर मातृत्वाची प्रेमळ जबाबदारी त्यांना उभारी देत होती. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिकत राहणे हेच त्यांचे ‘टॉनिक’ होते..  यासाठी त्यांनी ‘मागणी तसा पुरवठा’ हे व्यवसायातले सूत्र पूर्णपणे अंगीकारले. उत्पादनांच्या प्रचार आणि प्रसारा बरोबरच  आपल्यासारखा आणखी काही जणींना रोजगार मिळावा या भावनेतून व्यवसायाचा वटवृक्ष आज चांगलाच फोफावला आहे.

फेस्टिवल मध्ये गुढीपाडवा, दसरा,रक्षाबंधन बॉक्स,गणेशोत्सवमध्ये ५१ प्रकारचे मोदक,बर्थडे असे प्रकार तर सिजनल चॉकलेट्स मध्ये डार्क  चॉकलेट,मिल्क चॉकलेट,बटर स्कॉच,स्टोबेरी,काजू अश्या विविध ३० प्रकारात गिफ्ट पॅक मध्ये छोट्या-मोठ्या स्वरूपात ऑर्डर स्वीकारतात.आजवर सनज्वेल प्रा.लि.,व्होकार्ट,व्होडाफोन, प्रत्युष अडव्हर्ट,ग्लॅमक या मान्यवर कंपन्यांच्या त्यांना सतत ऑर्डर्स असतात.

थोडय़ाशा आर्थिक गुंतवणुकीचे त्यांनी सार्थक केले. त्यांच्याकडे असलेल्या कलेचे त्यांनी फार योग्य रीतीने नियोजन केले.त्यांना सासू,दोन बहिणी तृप्ती, मनीषा संजय अधिकारी, भाऊ विकास या सर्वाची मदत आहेच, शिवाय पतीचा दिलीपरावांचा ही भक्कम आधार आहे. त्यामुळे आज त्या समाधानी  आहेत. दोन मुलगी श्रिया या मेडिकल सायन्स तर प्राजक्ता कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएट होत आहेत.

Mrs. Varsha Deelip Malap
Email- yummies47@gmail.com
3/43 kalu bhuvan, opp. Vijaya bank, L.J road. Mahim mumbai: 400016

—- शैलेश संतोष इटले, ८९८३२९४९२९

5 Replies to “चॉकलेटच्या यशस्वी रुचिका : सौ वर्षा दिलीप मालप”

Leave a Reply

Your email address will not be published.