fbpx

सुभाष शांताराम जैन

फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, श्वसन विकारात वाढ होते, फटाक्यांच्या  महाभयंकर आवाजाने कानाचे पडदे फाटायची वेळ येते. आजाऱ्यांना त्रास होतो. पशुपक्षी प्राणी भयभीत होतात. अनेक सूक्ष्म जीवांची हत्त्या होते. 

           सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडावे असे बंधन सर्वोच्च न्यायालयाकडून नागरिकांना घालण्यात आले आहे पण त्याचे कठोर पालन होईल  असे वाटत नाही. आमचे सण  दिवाळी वर्षांतून एकदा येतो मग आम्ही तेव्हा फटाके वाजवायला बंधन आम्हाला मान्य नाही असा बहुसंख्य  वर्ग  असेल. सण उत्सव यावर बंदी हवीच कशाला?

       पण हीं काळाची गरज आहे हे समजून नको का  घ्यायला.शाळेची वेळ, कामाची वेळ ठरलेली असते, हे बंधन आपल्या हिताचेच आहे असे समजून त्याचे पालन करावे. आपल्या आरोग्य जपण्यासाठी त्याचे पालन करा. 

   फटाक्यांमुळे जीवित हानी भरून निघणे शक्य नाही, आगी लागतात  तेव्हा अपरिमित नुकसान होते, कमी आवाजाचे हरित फटाके वाजवून दिवाळी साजरी करा. वेळेचा भंग करू नका, दिवाळीत रसभंग होईल असे वागू नका त्यातच आपले  हित आहे. प्रदूषणाने आरोग्य बिघडून फुकट वैद्यांकडे जाऊन बिले भरू  नका. त्यापेक्षा  गरीब वस्तीत जाऊन फटाक्यांच्या बदली मिठाई घेऊन त्यांना मुलांना वाटा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील  आनंद पहा तुम्हीही आनंदून जाल.    फटाके लावा   मोकळ्या मैदानात, मुलांनी फटाके लावता   , मोठ्यांनी घ्यावी मुलांची दक्षता.

————–

सुभाष शांताराम जैन साईनाथ सोसायटी, वर्तक नगर, ठाणे 400606.  

jainsubhash961@gmail.com 

Mo 8779348256

Leave a Reply

Your email address will not be published.