fbpx

शीतल केसरकर

मोठ्या फटाक्यांचे पैसे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमाला दान द्यावेत

फटाकेबंदी विषयीच्या निर्णयावर माझं दुमत आहे. कारण सरसकट सगळ्या फटाक्यांवर बंदी घालायला नको. माझी मुलं लहान आहेत, त्यांना दिवाळीत छोटे फटाके फोडण्याचा आनंद मिळायलाच हवा. पण जे स्पर्धेसाठी हजार, वीस हजारांच्या माळा लावतात त्यावर बंदी आणली पाहिजे. तसंच फटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ असावी. आपल्याकडे रात्री-अपरात्रीही फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरु असतो. मोठ्या फटाक्यांमुळे पैशांचा कचराच होतो. त्यापेक्षा हे पैसे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमाला दान देऊन सत्कारणी लावावेत.

– शीतल केसरकर, प्रभादेवी

Leave a Reply

Your email address will not be published.