fbpx

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब — तानाजी रा.मालुसरे

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळी हे प्रकाशपर्व मानले जात असल्याने फटाक्यांची आतषबाजी हा या उत्सवाचा परंपरेने भाग बनला असल्याने या निवाड्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, या बंदीची पार्श्वभूमीही समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग पडले.

फटाक्यांच्या धुरामुळे हवेत सोडले जाणारे घातक प्रदूषणकारी घटक श्वसनातून मानवी शरीरात गेल्याने फुफ्फुसांचे गंभीर विकार संभवतात. त्यामुळे प्रदूषणाच्या नजरेतून अशा प्रकारची बंदी ही योग्यच आहे अशी भूमिका पर्यावरणप्रेमी घेत आहेत, महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब बनलेली आहे. प्रस्तुत निवाडा केवळ दिल्लीपुरता जरी असला तरी देशातील अन्य शहरांमध्येही परिस्थिती काही फारशी वेगळी आहे असे म्हणता येत नाही.

— तानाजी रा.मालुसरे, नवी दिल्ली 

Leave a Reply

Your email address will not be published.