fbpx

जनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची गरज — नरेश बुरवाडकर

पहिली बाब म्हणजे ऐन दिवाळीत ही मनाई आल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. फटाके उद्योग हा देशातील एक मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. त्या व्यवसायाच्या संपूर्ण साखळीवर या निवाड्याचा परिणाम संभवतो. फटाके ही काहींसाठी चैनीची वस्तू जरी असली, तरी त्यांचे उत्पादन, वाहतूक, विक्री या साखळीमध्ये असंख्यांची रोजीरोटी त्यावर अवलंबून असते हेही तितकेच खरे आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत जरी फटाके विक्रीस बंदी असली तरी बाजूच्या परिसरांमध्ये ती लागू नसल्याने तेथून दिल्लीत चोरून फटाके आणणे वा ऑनलाइन खरेदी करणे सहजशक्य आहे. त्यामुळे ही बंदी प्रत्यक्षात उतरवणे कितपत शक्य होईल हा खरा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट अमलात आणायची असेल तर सक्ती हा त्यावरचा उपाय ठरत नाही. जेव्हा ती गोष्ट पटते आणि स्वेच्छेने स्वीकारली जाते, तेव्हाच खर्या अर्थाने तिची कार्यवाही होत असते. फटाक्यांच्या वापरासंदर्भातही हेच आहे. जनतेला फटाक्यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम जेव्हा जाणवतील तेव्हाच तिला योग्य ते शहाणपण येईल. नुसत्या बंदीतून काळाबाजार, हप्तेबाजी, नफेखोरी यांचेच पेव फुटू शकते. त्यामुळे खरी गरज आहे ती जनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची. दिवाळी हे प्रकाशपर्व आहे,

— नरेश बुरवाडकर, नवी  मुंबई 

Leave a Reply

Your email address will not be published.