fbpx

फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला — संतोष कदम

खरेतर फटाक्यांवर संपुर्ण बंदी हवी होती…फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला,  चार पाच दिवस बंदी घालून कुठलं प्रदूषण थांबेल.एका विशिष्ट सणाला टार्गेट करणं चूकच.आधीच्या प्रदूषण नियंत्रण कायद्याचं किती पालन केले जात आहे,हे पडताळून बघा.उद्योगांनी हे कायदे फक्त नामधारी बनवून सोडले आहेत.

देशात दरवर्षी निवडणुका असतात.त्यात असंख्य फटाके फोडले जातात.तेव्हा प्रदूषणाबाबत काय केलं जातं? काहीच नाही.मग आम्हीच का पाऊल मागे घ्यायचं. सरकारने याबाबत कायदा करून काही तीव्र प्रकारच्या फटाक्यांवर निर्मिती व विक्री वर कायमस्वरूपी बंदी घालावी.म्हणजे कोर्टाचा हस्तक्षेप टळेल. खरे तर दिवाळीच्या ४ दिवसात फक्त १.०८% प्रदूषण होते, बाकी एकूण वर्षभरात९८.९३% प्रदूषण खराब नियोजन आणि नियमन यामुळे होते,ते कोण ठीक करणार?

— संतोष कदम, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published.