fbpx

मी अबला की सबला

किती सोसला मी वनवास
या जीवनात होती भास
गतकाळापासूनच होती बंदी
नाही मिळाली कधीच संधी

चूल आणि मूल इतकेच जग
नव्हते कुठेच मला महत्त्व
काय करणार होती मी मग
रामानेही पारखले माझे सत्त्व

त्यातूनही सावरून झेप घेतली
शिक्षण घेऊन मी सबला बनली
सारी क्षेत्रे मी पादाक्रांत केली
शिक्षणरूपी पंखाने गगनभरारी मारली

पण संपलेच नाही माझे कष्ट
अजूनही माझ्यावर नजरा दृष्ट
आधी होती अबला म्हणून दुःखी
सबला होऊनही नाही मी सुखी

कधी संपेल का हा माझा संघर्ष
लढतेय त्यासाठीच किती वर्ष
आनंदाचे जगणे आहे माझ्याही नशिबी
उमटेल का कधी चेहऱ्यावर हर्ष

©®श्रीमती साईली राणे सावरकर नगर,ठाणे
सहाय्यक शिक्षिका पराग विद्यालय,भांडुप
सेवाकाल २५वर्षे

2 Replies to “मी अबला की सबला”

  1. स्त्रियांच्या आजच्या आणि कालच्या स्थिती यावरील आपली कविता…..आज आपन पाहतो की महीला आथ्रीक दृष्ट्या सबला झाली असली तरी प्रत्येक ठीकानी तिची वाटचाल ही संघर्षमय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.