fbpx

सोबतीण

सखे इथे तुच तुझी सोबतीण आहेस गं
वाचून काढ पुस्तके
अन् शिकून घे संगणक
हो ज्ञानाने परिपूर्ण सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

हिरकणी तू—शूर नारी तू
शिकून घे संरक्षणाचे धडे
तुलाच करायचे तुझे रक्षण सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

जरा वेळ काढ आपल्यासवे
आनंद मिळे छंद जोपासवे
कर मिळकत त्यातून सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

नको घेऊ उपकार कुणाचे
नको दबू पुढे कुणाचे
हो परिपक्व तू पूर्णत्वाने सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

नको रमू वाॅट्सअप न् फेसबुकात
शिकून घे नेटबॅंकिंग अन् शेअरबाजार
हो व्यवहार चतुर सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

दुसऱ्याचं प्रेमाखातर करता करता
कधीतरी पडगं स्वत:च्या प्रेमात
जाणून घे गं स्वत:चं अस्तित्व सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

नको तुझ्यावर नवऱ्याचा मालकीहक्क
अन् नको सासू-सासऱ्यांच्या मिळकतीत हिस्सा
हो तुच तुझीच स्वतंत्र सखे
इथे तुच आहेस तुझी सोबतीण गं

मनिषा यशवंत विसपुते…..

8 Replies to “सोबतीण”

  1. खुपच सुंदर कविता..स्त्रियांनी आजचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वतः प्रगल्भ होणे गरजेचे झाले आहे. यामुळेच मुलगा-मुलगी भेदभाव दूर होइल आणि प्रत्येक धर्मामध्ये, प्रदेशामध्ये मूलींचा आणि त्याबरोबरच समाजाचाही विकास होइल.

Leave a Reply

Your email address will not be published.