fbpx

मी जगायला शिकले

वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर
मी आता जगायला शिकले
मैशिणी बरोबर हसायला शिकले
आपल्या मनासारखे जगायला शिकले.

जीवनाला खुप बारकाईने समजल्यानंतर
आता मी त्याला जसे आहे तसे स्वीकारायला शिकले
कुणालाही आपल दुख न सांगता
हसता हसता जगायला शिकले.

जीवनाचे कोडे पडल्यानंतर
त्याला सहजपणे सोडवायला शिकले
लोकांच्या चेहऱ्यातला लपलेला खोटा चेहरा समजून गेल्यानंतर
न रागवता आता त्याना संथपणे हाताळायला शिकले.

कोणी कितिही नावे ठेवली
तरी आपल्या मनासारख जगायला शिकले
खरच आता जीवनचा खरा अर्थ कळल्यावर
आता माझ्या स्वतःसाठी
मी आता जगायला शिकले.

— आरती ओमप्रकाश मिश्रा

40 Replies to “मी जगायला शिकले”

  1. खूपच छान आहे कविता….. स्त्रियांच्या मनातली भावना व्यक्त केली आहे

  2. चाळिशीच्या स्त्रियांची मन ओळखणारी कविता आहे……. खूपच छान कविता आहे आरती..

  3. थोडक्यात पण एकदम अप्रतिम पद्धतीने लिहला आहे. खूपच छान

Leave a Reply

Your email address will not be published.