fbpx

कधी भेटशील… तर, सांगशील न मला…??

“गेल्या कित्तेक ऋतूंचा, माझ्या विरहातला हिशेब…
“माझ्याविना जगलेले क्षण…अन’ कातरवेळी
सोबतीला आलेली, माझ्याच आठवणींची ऊब…
सांगशील कितीदा .चांदण्याशी काळोख रात्रीत ,
माझ्या विरहात केलेले गुजगीत….
“सांगशील..तुझ्या घराच्या छतावरून…
आकाशातुन तारा तुटताना तू मलाच मागितलेले…?
अन कितीदातरी तुझे पाय माझ्या घराच्या वळणावरचं वळलेले…
सांगशील तुझे कितीतरी क्षण…माझ्या वाटेवर रेंगाळले..
“अन पापण्यात आसवांचे तू गाव थोपवलले…
“सांगशील प्रत्येक पहिल्या पावसात तुझं माझ्याविना मनसोक्त भिजणं..
पावसाचा करून बहाणा..
आठवात माझ्या आभाळभर रडून घेणं…
‘सांगशील तुझ्या डोळ्यातुन वाहिलेले ते इंद्रधनुचे रंग…
अन कोरडेच परतवलेले मनावरील क्षणऋतूंचे तरंग …
सांगशील न तुझ्या स्वप्नात माझं कितीदा होई येणं…
व्हावं स्वप्नं तेही स्वप्नं..
का?हातावरच्या रेषांचं कधीच न होईल भेटणं…!”
“कधी भेटशील तर सांगशील न….💕?

©डॉ स्वातीआनंद 
drswativanve@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published.