fbpx

वेदना काटेरी

आयुष्य आहे माझे सारे
दु:खाने भारलेले ।
काटा टोचता हृदयी , मन
वेदनेने झंकारले ।।
वेदना कित्येक माझ्या ,उरी
दडपून मी ठेविल्या ।
त्या वेदनांना मी, सुखाच्या
चरणी वाहिल्या ।।
आवळून मुसक्या सुखाच्या ,दु:खाने
आसूड ओढले ।
त्या दु:खाच्या ढिगार‍्यातुन, मी
स्वत:स वर काढले ।।
काट्यांनी जरी हैराण, टोचून
मज केले ।
त्या काट्यांतून मी, फुलास
अलगद खुडून काढिले ।।

प्रतिभा दीपक पवार
महाड – रायगड

2 Replies to “वेदना काटेरी”

  1. हृदयस्पर्शी कविता काळजाचा ठाव घेते.कवयित्रीला हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.