fbpx

क्षण

एकेक क्षण निघून चालला
आयुष्यातून ।
जशी निसटावी वाळू
मूठीतून ।।
म्हणून सुखाचे क्षण ठेवा
अलगद जपून ।
दु:खाच्या लडींना द्या
सोडून ।।
करू नका हिशोब
सुख-दु:खाचा ।
प्रत्येक क्षणांत माना आनंद
जीवनाचा ।।
बेसूर सुरांच्या छेडिल्या
कुणी तारा ।
आळवून सुरेल सुरांना तुम्ही
मधुर झंकारा ।।
ओठावर ठेवा नेहमी
हास्याचे गीत ।
ऐकू येईल तुम्हाला
जीवनाचे संगीत ।।

प्रतिभा दीपक पवार
महाड-रायगड

Leave a Reply

Your email address will not be published.