fbpx

विचार बदलू या

मुले परदेशात आईवडील वृद्धाश्रमात चर्चा तर होतच राहते
जन्मदात्यांना सांभाळणं मुलांचं कर्तव्य आहे हे मलाही मान्य आहे
पण आपणच त्याना मोठी ध्येये दिली.गरुडाचे पंख दिले
आकाशात झेप घेतली तेंव्हा केवढा आनंद झाला होता
त्यानी त्याचं जग निर्माण केलं
आपली आठवण येते कुणाला?
शेवटच्या क्षणी येतील का? म्हणून रडत नाही बसायचं
जी आपल्या जवळ आहेत
त्याना आपलंसं करुन बघा
जगणं सुसह्य होईल आपला आनंद आपणच शोधायचा.
तीन तीन मुलं असूनही
आईवडील वेगळे राहतात
निभत नाही तरी करुन खातात
मरण तर एकदिवस येणारच
वाट नाही बघायची!
उरलेला प्रत्येक क्षण जोमाने
अन् मनापासून जगायचा!
थोडा विचार बदलू या
देहदानाचा संकल्प करु या!

——-:——–:——–:——–
डॉ मालती रवींद्र पाटील
ता-वाळवा, जि-सांगली 415409

Leave a Reply

Your email address will not be published.