fbpx

ओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची

नमस्कार,

मैत्रिणींनो सांज सखी मध्ये आपण महिलांच्या विविध कायद्यांविषयी माहिती घेणार आहोत, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ! असं म्हणतात स्त्री समस्येला सुरुवात होते जन्मापासूनच , मुलगी म्हणून तिला नाकारला जातं.  भारतामध्ये सध्या लोकसंख्येतील स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळत आहे याचे मुख्य कारण म्हणजे , अल्ट्रासोनोग्राफी मार्फत होणारे गर्भलिंग निदान चिकित्सा .

आपली संस्कृती आणि तिचे संस्कार इतके खोलवर रुजलेले आहेत की प्रत्येकाला आपल्याला मात्र मुलगा हवा,  मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हातारपणात आधार आहे असा समज आहे व मुलगी नको कारण ती परक्याचे धन आहे अशी सामाजिक मानसिकता आहे.  इथे मला माझ्या विषयी सांगावसं वाटतं की, माझं नाव सुजाता लाड कोरडे आहे माझा जन्म लाड घराण्यात झाला आणि मी मरेपर्यंत लाड नावानेच राहणार आहे , कारण मी गॅझेटमध्ये माझं नाव मरेपर्यंत लाड कोरडे कायद्याने नमूद करून घेतला आहे . दुर्दैवाने आपल्या पोटी मुलगा हवा या हव्यासापोटी सोनोग्राफीद्वारे गर्भात मुलगा आहे का मुलगी आहे हे लोकं पाहू लागले आहेत .

वास्तविक पाहता लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे माहीत असूनही बरेचसे डॉक्टर्स व पालक यांच्या संगनमताने हे काम गुप्तपणे चालू असते

भारतात प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा 1994 करण्यात आला . गर्भलिंगचिकित्सा  विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आपल्याकडे 1998 मध्येच हा कायदा लागू करण्यात आला . या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे

या कायद्याचा हेतू ;-

 1] गर्भधारणेपूर्वी व नंतर गर्भाचे लिंग ओळखण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्यांवर बंदी करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे .

 2] जेणेकरून मुलीच्या जन्म आधीच भ्रूणहत्येच्या प्रथेस आळा घातला जाईल .

 3] मात्र अशा वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे गर्भातील जैविक गुणदोष ,आजारांबद्दल च्या माहितीसाठी केलेल्या चाचण्यांचे नियमन या कायद्याद्वारे केले गेले आहे.

गर्भलिंग चाचणी कशी होते ;-

गर्भलिंग परीक्षण अल्ट्रासोनोग्राफी रक्तचाचणी किंवा इतर अशी कोणतीही चाचणी ज्यामुळे गर्भाचे लिंग ओळखणे शक्य होईल.

कायद्याने नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञाला वैद्यकीय प्रयोगशाळेत खालील रोगासंबंधी निदान करण्यासाठी सर्व चाचणी करता येते –

 गुणसूत्रातील दोष,

 लिंगा संबंधीचे जनुकीय दोष ,

वंशपरंपरागत रोगनिदान,

 या कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या समितीने मान्यता दिलेले इतर आजार किंवा दोष.

परंतु कायद्याने गर्भचाचणी करण्यापूर्वी संबंधित महिलेकडून लेखी परवानगी घेण्याची जबाबदारी वैद्यकीय तज्ञi वर आहे

या गर्भवती महिलेचे वय किमान 35 वर्षे असावे,

नैसर्गिक रित्या दोन वा जास्त वेळा गर्भपात झाल्यास,

गर्भवती महिलेस रासायनिक भौतिक व इतर कारणांमुळे बाधा झाल्यास,

गर्भवती महिलेस तिच्या पतीस किंवा त्यांच्या कुटुंबात कोणालाही जनुकीय गुणसूत्र आजार असल्यास

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र [ लिंगनिवडीस प्रतिबंध ]कायदा 1994 सुधारित 2002 नंतर गर्भचाचणी तंत्रज्ञान जनुकीय व जैविक दवाखाने प्रयोगशाळा उघडण्यासाठी सरकारकडे अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे

 इस्पितळे जैविक केंद्र व प्रयोगशाळांना त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या गरजाची माहिती रजिस्टरमध्ये ठेवणे जरुरीचे आहे, व मागच्या दोन वर्षापर्यंत ची पूर्ण माहिती उपलब्ध असलेली बंधनकारक आहे.

 कायदा हेही सांगतो की जिथे सोनोग्राफी केली जाते ती जागा , सोनोग्राफी करण्याचे मशीन आणि ते मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची नोंदणी केली पाहिजे तसेच संबंधित व्यक्ती प्रशिक्षित आणि पात्र हव्यात.

वेटिंग रूम ,ओपीडी ,सोनोग्राफी मशीनच्या शेजारी ‘’ येथे गर्भलिंग तपासणी केली जात नाही ‘’असा बोर्ड असायला हवा , डॉक्टरांकडे या कायद्याची प्रत असायला हवी , सोनोग्राफी मशीन वापरण्यासंबंधी चे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असावे , सोनोग्राफी मशीन केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेले असावे.

कायद्यात काही तरतुदी देखील आहेत ,

पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंदी , पोटातील गर्भाचे लिंग माहित करून घेत गर्भपात करण्यास बंदी , पोटातील गर्भाचे लिंग माहित करून मिळेल अशाच स्वरूपाची जाहिरात करण्यास बंदी,  कायद्यातील तरतुदी न पाळल्यास शिक्षा.

कोणत्याही व्यक्तीने किंवा विशेष तज्ञाने वापरण्याच्या गटाने स्त्री किंवा पुरुषाच्या दोघांची चाचणी करून गर्भधारणेपूर्वी व नंतर गर्भाचे परीक्षण करणे गुन्हा असून त्यासाठी प्रथम वेळेस तीन वर्षापर्यंत ते दहा हजार रुपये दंड ,  तर नंतरच्या प्रत्येक होण्यासाठी पाच वर्षापर्यंत त्व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा आहे.

 नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्याची नोंदणी रद्द होईल गुन्हा सिद्ध झाल्यास प्रथम वेळेस त्याची नोंदणी पाच वर्षासाठी तर दुसऱ्या वेळेस नेहमीसाठीच रद्द करण्यात येईल .

संबंधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रसार करणे गुन्हा आहे त्यासाठी संबंधित व्यक्तीला तीन वर्षापर्यंत ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो

जी व्यक्ती गर्भाचे लिंग ओळखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करून घेण्यास कोणत्याही दवाखान्याची केंद्राची किंवा प्रयोगशाळेची मधून घेते म्हणजे करता यावा यासाठी त्या व्यक्तीस प्रथम वेळेस तीन वर्षे 50 हजार रुपयांपर्यंत दंड तर नंतरच्या प्रत्येक होण्यासाठी पाच वर्षापर्यंत ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो .

 लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरला किंवा त्यास संस्था प्रमुख झाला तीन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि रुपये दहा हजार दंड होऊ शकतो.

तक्रार कोठे कराल?

एखाद्या ठिकाणी गर्भलिंगनिदान चाचणी होत आहे असे निदर्शनास आल्यास या बाबीची तक्रार करण्याकरिता विविध पातळीवर अधिकारी नेमलेले आहेत. महापालिका क्षेत्रात असेल तर महापालिकेचे आरोग्य अधिकारी, जिल्हा पातळीवर जिल्हा शल्य चिकित्सक, ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अशा व्यक्तीकडे तक्रार नोंदविता येते अधिक माहितीकरिता जवळच्या आरोग्य केंद्रात आपण चौकशी करू शकता.

—–  अॅड. सुजाता लाड  

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.