fbpx

चिंतनिका …

१३ फेब्रुवारी १९८८ ची थंडगार धुकेरी सकाळ.समुद्र आज फारच खुशीत दिसतो आहे. धोक्याने आणि पांढुरक्या ढगांनी आकाश खाली आले आहे. समुद्र आणि आकाशातले अंतर कमी झाले आहे. बघता बघता त्या देखाव्याची झाली एक प्रचंड सुंदर शिंपली. वरचा भाग आकाशाचा नि खालचा समुद्राचा. क्षितिजापाशी तिचा सांधा होता नि ते पांढरे पाणपक्षी मोत्याच्या दाण्यासारखे भासत होते. आज त्या शिंपलीत आनंदाचे मोती पहुडले होते. नि तो आनंद मला स्पर्शत होता खूप तलम जागृती नि अभंग तंद्री त्या आनंदमय भानात भरली होती. क्षणभर मी जन्माची तृप्त झाले. होय ! मी जन्म पाहत होते प्रत्यक्ष आनंदाचा, सावळा समुद्र नि धूसर आकाशाच्या अर्धोनमिलीत शिंपलीतील श्यामल आनंदाचा.

दुपानी (दुर्गा भागवत )

Leave a Reply

Your email address will not be published.