fbpx

पौष्टीक उपमा

साहित्य :

एक वाटी रवा, एक वाटी सोयाबीन, पाव वाटी मोडाची मटकी, पाव वाटी पालक बारीक चिरून, पाव वाटी फरसबी बारीक चिरून वाफवून घेणे, एक मोठा कांदा, एक गाजर, दोन टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, दोन भाजलेले पापड, थोडी चिरलेली कोशिंबीर, मोहरी, जिरे, हिंग तेल, मीठ, कढीपत्ता  

कृती : 

मिक्सरमध्ये सोयाबीनचा रवा तयार करून घ्या. रवा पातेल्यात भाजत घाला. अर्धवट भाजत आल्यावर त्यात सोयाबीन चा रवा मिसळून हलका भाजून बाजूला ठेवा. कांदा बारीक चिरून ठेवा. गाजर किसून ठेवा. एका कढईत तेल गरम करा.त्यात मोहरी,जिरे,कढीपत्ता, हिंग घालून फोडणी करा, त्यात चिरलेला कांदा,पालक,गाजर,फरसबी,मटकी घाला.

मंद आचेवर हे सर्व जिन्नस पाच मिनिटे चांगले वाफवा. बेताचे पाणी व मीठ घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात रवा टाका. शिजल्यावर भांडे खाली उतरवा, वाढताना त्यावर चिरलेले टोमॅटो, पापडाचा चुरा व चिरलेली कोथिंबीर पसरून घाला.

Leave a Reply

Your email address will not be published.