fbpx

मराठा समाजाला आरक्षण द्याच

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे. मागासवर्गीय आयोगाने नुकताच आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे. मराठा समाजातील तब्बल ८६ टक्के जनता ही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निर्वाळा या अहवालात देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे. गेले काही दिवस मराठा समाज ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे, त्या आरक्षणाच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसांत करून आता हा विषय संपुष्टात आणला पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाच्या जखमेवर मीठच चोळण्याचा प्रकार एकप्रकारे झालेला दिसून येतो. म्हणून आता अधिक विलंब न लावता तातडीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत याबाबत निर्णय घेतला पाहिजे.

गेल्या दीड वर्षात कोपर्डीतील बलात्कार प्रकरण झाले आणि मराठा समाज आक्रमक झाला. आपल्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी राज्यभर मोर्चे काढले. शांततेच्या मार्गाने मोर्चे काढूनही सरकार ढिम्मच होते. तरीही मराठा समाज शांत बसला. पण आता या समाजाचा आणखी अंत न पाहता राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. आजपर्यंत मराठा समाजाचा वापर सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला. पण त्यांना आरक्षण देण्याच्या मुद्दय़ाबाबत एकजूट न दर्शवता या राजकीय पक्षांनी या मुद्दय़ाचा राजकीय लाभासाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सहा महिन्यांत मराठा समाजाची आक्रमकता वाढली. आता मागासवर्गीय आयोगाचा अहवालही सरकारला मिळालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा अंत न पाहता आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा.

-दादासाहेब येंधे  (dyendhe@rediffmail.com)

 

Leave a Reply

Your email address will not be published.