fbpx

मराठा मते जातील हि सरकारला भीती

स्वातंत्र्यानंतर सत्तेत जास्त संख्येने व जास्तवेळा मराठा आमदार व मुख्यमंत्री राहूनही त्यांनी मराठा जातीला कधी आरक्षण दिले नाही ना मराठ्यांनी हट्टाने मागितले पण सतत सत्तेत राहिलेले सत्तेबाहेर गेल्यावर त्यांची तडफड सुरू झाली (त्यात ब्राह्मण मुख्यमंत्री) मग मराठा समाजास आरक्षण मिळावे अशा बातम्या पसरवल्या आणि पडद्यामागून हवा दिली गेली त्यामुळे दिड वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातून पाच ते पंचवीस लाखांचे अभूतपूर्व शांततापूर्ण मोर्चे निघाले तरी सरकारने महत्व न दिल्याने काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निघालेल्या मराठा मोर्चातील मोर्चेकरी थोडे आक्रमक झाले. आता येत्या निवडणुकीत मराठा मते जातील अशी भीती झाल्यावर सरकारने येत्या दहा दिवसांत मराठा आरक्षण मंजूर करणार असे जाहीर करून मराठा जातीला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉंग्रेसने आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला यावरून नेत्यांना राज्य / देश यापेक्षा सत्ता आणि राजकारण महत्वाचे आहे हेच समजते. दुर्दैव म्हणजे त्यांनी टाकलेल्या दाण्यांसाठी आम्ही झुंजत राहातो. खरेतर आता सगळीच आरक्षणे बंद व्हायला हवीत. आरक्षणा ऐवजी जो ज्या पदासाठी लायक असेल त्याची निवड व्हायला हवी.

 – मनमोहन रो.रोगे, ठाणे. ९८६९१८०९५८

One Reply to “मराठा मते जातील हि सरकारला भीती”

Leave a Reply

Your email address will not be published.