fbpx

दिवाळी अंक : स्पर्धा-प्रदर्शन २०१८ संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने ४२  वे राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कळवले आहे. १९७६ पासून हि स्पर्धा विनामूल्य घेतली जाते.

या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र ,मित्र स्मृती पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक यासह उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतो. स्पर्धेसाठी सर्वाधिक संख्येने येणारे हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालये यांना मोफत दिले जातात. दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती – रवींद्र मालुसरे- घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५  येथे पाठवाव्यात. असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. कार्यालय इमारतीची दुरुस्ती चालू असल्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी रमेश सांगळे (कार्याध्यक्ष )९८२१५७४८९१ / ९३२३११७७०४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे

2 Replies to “दिवाळी अंक : स्पर्धा-प्रदर्शन २०१८ संपादक-प्रकाशकांना आवाहन ……”

  1. दिवाळी अंकाचे प्रदर्शन स्पर्धा छान उपक्रम मराठी वृत्तपत्रलेखक संघाने आयोजित केला आहे. शुभेच्छा! -दादासाहेब येंधे

Leave a Reply

Your email address will not be published.