fbpx

पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रा

ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १२ वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते.  ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर पर्यंत ऍग्रिकल्चरल ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे.

पुरूषांच्या बरोबरीने महिलांनी करिअरची नवी क्षितीजे गाठायला सुरुवात केली खरी मात्र, यशस्वी उद्योजिका म्हणून नाव मिळवायला त्या फारशा पुढे आलेल्या दिसत नाहीत. शहरात अगदी बोटावर मोजण्याइतक्या उद्योजिकांची नावे सांगता येतील. पण, त्यांच्या यादीत नव्या नावांची भर फारच कमी पडते. नोकरीसाठी महिला परदेशाची वाट धरत असताना व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मूळ धरण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. मात्र, या परिस्थितीला आता चांगले दिवस येत आहेत. ग्रामीण भागातून पारंपरिक व्यवसाय पुढे आणत अनेक महिला उद्योगाच्या विकासासाठी परदेशाच्याही सीमा ओलांडत आहेत. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा असला तरी, महिलांना व्यवसायाकडे आकषिर्त करण्यासाठी सुरुवात झाली आहे, हे महत्त्वाचे. या बदलांमध्ये पुण्यात दरवर्षी भरणाऱ्या भीमथडी जत्रेचाही मोठा वाटा आहे.

श्रीमती सई पवार नेगी यांनी तयार केलेल्या ३० स्टॉलचे ‘भीमथडी सिलेक्ट’ हा एक वेगळा व आकर्षक विभाग आहे. यामध्ये भारतातील पारंपरिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तकला पुनरुज्जीवित व टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्या कारागिरांना व डिझायनरला टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या ह्या विभागात समावेश केला आहे. विजय नारकर, अवरण आणि कच्छ चे कारागीर ही नावे जे भीमथडी सेलेक्ट मध्ये आपल्या वस्तू प्रदर्शित करतील.

महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला  आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक  उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.

अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारामतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १४ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे.

मागिल वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला, १.५  लाखांहूनही अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कती अनुभवली.  ह्या वर्षी देखील ३०२ हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील.या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं वेगळेपण/ आकर्षण  म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते.

भीमथडीने महिलांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली. याच्या अनेक यशस्वी गाथा तयार झाल्यात. भागातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी व्यवसायासारखे दुसरे साधन नाही. मात्र, त्यांना लोणची, पापडाच्या चौकटीतून बाहेर आणणे महत्त्वाचे होते. त्यासाठी उत्पादनात नावीन्य आणण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. रोजची भाजी-भाकरी विकूनही चार पैसे कमवता येतील, हे त्यांच्यात रुजवायचे होते. याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भीमथडीची कल्पना पुढे आली. नसल्यामुळे रोजगार नाही आणि त्यामुळे गरिबी असे समीकरण मांडले जाते. यशस्वी होण्यासाठी किंवा रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण आवश्यक असले तरी तो एकमेव पर्याय आहे नाही. महिलांना सबळ करायचे असेल तर भीमथडीसारख्या जत्रांचे जाळे राज्यपातळीवर व्यापक झाले पाहिजे. तरच यशस्वी उद्योजिकांची संख्या वाढती राहील असे सुनंदा पवार यांनी सांगितले.

– रवींद्र मालुसरे

 

Leave a Reply

Your email address will not be published.