fbpx

अनेक रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी …आलं (अदरक) खा

असाध्य रोगांना दूर करणारे आलं याला वरदान लाभल्याने आयुर्वेदात आलं (अदरकाला) औषधी असल्याचे म्हटले आहे. त्यात अनेक औषधी गुण आहेत. तोंडापासून ते घशापर्यंतच्या अनेक रोगांत आलं गुणकारी आहे. आलं पचनशक्ती वाढविते. उलटी, खोकला, कफ, अपचन, गॅसेस, अशा अनेक आजारांत आलं रामबाण औषधी म्हणून वापरले जाते. याशिवाय याचा पुढीलप्रमाणे उपयोग करून रोगांपासून मुक्ती मिळवता येईल.
* आल्याचा अधिकाधिक वापर केल्याने थंडी, ताप, घशाला सूज, हिरड्यांचे दुखणे आदी आजार कमी होतात.
* आल्याचा रस आणि पाणी समसमान प्रमाणात एकत्र घेतल्यास हृदयरोगात लाभ होतो.
* आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चावत राहा न थांबणारी उचकी थांबेल.
* पाण्यासोबत सुंठ घासून यात थोडे जुने गुळ आणि पाच सहा थेंब तूप मिसळून गरम करून घ्या. जुलाब कमी होईल.
* आल्याच्या रसात मध मिसळून चाटल्याने दमा कमी होतो.
* आलं खाल्ल्याने तोंडातील हानीकारक बॅक्टेरिया मरतात.

Leave a Reply

Your email address will not be published.