fbpx

साहित्यिका सौ सुरेखा गावंडे यांना “राष्ट्रीय साहित्यगौरव पुरस्कार “

नवी दिल्ली येथील इंडिया गेट जवळील आंध्रा भवन येथे रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय प्रतिभा सम्मेलन-२०१९ मोठया दिमाखात पार पडले.अनेक प्रतिभावंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.मिझोरम राज्य भारत सरकार मा.राज्यपाल मा.श्री.अमलोक रतन कोहली यांच्या हस्ते कल्याणच्या साहित्यिका सौ सुरेखा गावंडे यांना “राष्ट्रीय साहित्यगौरव पुरस्कार ” देऊन सन्मान करण्यात आला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री मा.श्री.संजय धोत्रे तसेच मा.डॉ.श्री.नरेंन्द्र जाधव,मा.श्री.मनोहर जाला,मा.संभाजीराजे भोसले आदि मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ,पंजाब हरयाणा ,हिमाचल , तामिळनाडू कर्नाटक , छत्तीसगड सह विविध राज्यातील सेवेत असलेले शासकीय केंद्रीय अधिकारी कर्मचारी अभिनेते लेखक, साहित्यिक, कवी, डॉक्टर, वकील, पत्रकार ,संस्था चालक ,याना सामाजिक कार्याचा प्रस्ताव मागवून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा गौरव करण्यात  आला .या कार्यक्रमाचे मुख्य  आयोजक डॉ. मनीष गवळी चीफ एडिटर, क्रांती महाजन नवी दिल्ली यांनी केले आभार अनिताजी यांनी केले.

3 Replies to “साहित्यिका सौ सुरेखा गावंडे यांना “राष्ट्रीय साहित्यगौरव पुरस्कार “”

  1. माझ्या वर्ग मैत्रिणी पूर्वाश्रमीच्या सुरेखा पवार आणि आताच्या कवियत्री सौ. सुरेखा गावंडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शिवाभिनंदन हार्दिक शिव शुभेच्छा अशीच उत्तरोउतर विकास होवो हीच शिव चरणी प्रार्थना

  2. सुरेखा तुझ खूप खूप अभिनंदन अशीच पुढे
    पुढे जा खूप मोठी हो

Leave a Reply

Your email address will not be published.