fbpx

महिषासुरमर्दिनी

महिषासूर हा एक असूर (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले त्यातून महाषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हईस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे.संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.


असुरांचा राजा महिष याने ब्रम्हाकडून एक वर मिळवला, ज्यायोगे कोणतीही वनस्पती, कोणताही प्राणी,मनुष्य,राक्षस किंवा देव त्याला मारू शकणार नव्हते. ब्रम्हदेवाची भक्ती केली व त्यांचेपासून वर प्राप्त केला कि, कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही.या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला.त्याने इंद्रपद बळकावले. अशी शक्ती मिळाल्यावर महिषाने देवांना त्यांच्या आकाशस्थ दैवी लोकांतून हाकलून दिले. ते त्यांच्या निर्मात्यांकडे, ब्रम्हाकडे गेले. ब्रम्हाने त्यांना विष्णूकडे जाण्यास सुचवले. विष्णूने त्यांना शिवाकडे पाठवले. शिवाने देवांना सांगितले की, त्या सर्व देवांनी त्यांच्या सर्व शक्ती एकवटून त्यातून एकच शक्तिशाली अस्तित्व निर्माण करावे. सर्व देवांनी आपल्या मुखाद्वारे अग्निज्वालेच्या रूपात आपली शक्ती बाहेर टाकली. त्या सर्व शक्ती एकत्र होऊन त्यातून अत्यंत देदीप्यमान अशी अग्निशिखा निर्माण झाली आणि त्यातून एक विलक्षण तेजस्वी अशी दुर्गा नावाची अष्टभुजा योद्धा स्त्री बाहेर आली. सिंहवाहनावर आरूढ होऊन ती युद्धात उतरली.

महिषाला तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले आणि ती आपली पत्नी व्हावी अशी त्याला इच्छा झाली. विवाहाचा प्रस्ताव घेऊन त्याने आपल्या सेनापतीना तिच्याकडे पाठवले. तिने उलट निरोप पाठवला की, जो कुणी तिला युद्धात पराजित करेल.त्याच्याशीच ती विवाह करे. तिला बळपूर्वक घेऊन येण्यासाठी महिषाने अनेक योध्याना धाडले. पण तिने प्रत्येकाला मारून टाकले. अखेर महिषाने सिंह,हत्ती,रेडा अशी अनेक प्राण्यांची रूपे घेऊन तिच्यावर हल्ले केले. नऊ दिवस नऊ रात्री चाललेल्या या प्रचंड युद्धाच्या शेवटी तिने आपला त्रिशूळ महिषाच्या शरीरात भोसकला. त्याचे निर्दालन देवी दुर्गेने केले म्हणून देवीस महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. याचेपाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात त्यांचा देवीने पराभव व वध केला.त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले.हे युद्ध ९ दिवस चालले. अंतिमतः देवीने त्याचा युद्धात शिरच्छेद केला अशी माहिती सप्तशती या ग्रंथात येते. युद्धात तिचा विजय झाला, कारण स्त्रीपासुन सरंक्षण मागावे, हे वर मागताना महिषाला सुचलेच नव्हते.

– रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४

Leave a Reply

Your email address will not be published.