fbpx

शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव २०१९

प्रतिवर्षीप्रमाणे घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली.९शक्तिंची रूपे घेऊन आलेल्या शिवाईनगरच्या माऊलीचे ढोल,ताशे,भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या घालून दमदार आगमन झाले.शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सवाचा सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमांची समृध्द परंपरा लाभलेला महामेरु अखंडपणे गेली ३२ वर्षे समाजहितास्तव अविरत,अविश्रांत दौडत आहे.मा.सभापती ,स्थायी समिती, ठा.म.पा.सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचेअध्यक्ष मा.श्री.सुधाकर वामन चव्हाण(सुधाभाई) यांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.शिवाईनगरचा उत्सव ठाणे शहराची शान म्हणून ओळखला जातो. सांस्कृतिक व वैभवशाली परंपरा आणि शिस्तबद्ध नियोजन असणारा हा उत्सव भव्यदिव्य आरास आणि सजावटीसाठी ठाण्यात नावाजलेला आहे.

शारदीय चांदण्यांची 
झाली बरसात
शिवाईनगरची माऊली 
आली सोनपावलात

नऊ दिवसांमध्ये देवीची नऊ वेगवेगळी रुपे आपल्याला पाहायला मिळतात. नवरात्रोत्सवात प्रसिद्ध शक्तिपीठांच्या स्थळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेक भाविकांची इच्छा असूनही खर्चाच्यामुळे दर्शनाला सगळीकडेच जाता येत नाही. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदा भाविकांची ही अडचण ओळखून महाराष्ट्रासह भारतातील प्रसिद्ध देवीच्या प्रतिकृतीचा देखावा उभारण्याचा मानस घेऊन तो प्रत्यक्षात आणला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता, वणीची सप्तश्रुंगी माता ही साडेतीन शक्तीपीठ तसेच कार्ल्याची एकविरा देवी, गुजरातची चामुंडा माता, कोलकाताची कालीमाता आणि कटाराची वैष्णोदेवी माता यांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे, असे आयोजक सुधाकर चव्हाण यांनी सांगितले.
मूर्तीकार श्री.सतीश मांडोळकर यांनी साकारलेली  सुंदर,मोहक देवीची मूर्ती पाहिली की मनाला वेगळेच समाधान मिळते.

देवीचा नऊ दिवस जागर असतो. नवरात्रोत्सवात ९ दिवस देवीची भक्तीभावाने पूर्जा-अर्चा केली जाते. विविध धार्मिकआणि सांस्कृतिक कार्पामांचे आयोजन करण्यात आले आहे. जागर म्हणून  रासगरबा असणारच, रासगरबा हे येथील नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण आहे. दुर्गा म्युझीकल समूहाच्या सुखद,बेधुंद करणार्या संगीताच्या  तालावरती नाचणार्या तरूण तरूणी अबालवृद्धांचा जल्लोष सगळ्यांचे चित्त वेधून घेतो. 

आदीशक्ती आणि नारीशक्तीचा जागर असणार्या या उत्सवात स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापैठणी स्पर्धा आणि भोंडल्याचे आयोजन  याठिकाणी केले जाते.संगीतमय मैफल,सुश्राव्य भजन,गुजराती महिलांचा पारंपारीक रासगरबा,सहस्त्रनाम वचन,कुंकुमार्चन,हळदीकुंकू समारंभ,गोंधळ,जागर,दुर्गा सप्तशती पाठाचे सामूहिक वाचन,पुरणाच्या दिव्यांची महाआरती,दिवट्या नाचवणे  सारखे पारंपारीक उपक्रम  तसेच वेशभूषा स्पर्धा गुणवंतांचा सत्कार,शमीपूजन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनीयुक्त पंचपक्वान्नीय सांस्कृतिक मेजवानीच आपल्याला अनुभवायास मिळते.नऊ दिवसात  आशेचे नऊ रंग भरणारा हा शिवाईनगर नवरात्रोत्सव हा ठाणेकरांसाठी एक पर्वणीच असते.अनेक मोठे कलकार यासाठी देवीचे आशिष घेण्यासाठी  येतात.शिवाईनगरवासीयांना,देवीभक्तांना एका सुंदर एकात्मतेच्या माळेत हा उत्सव बांधून ठेवतो.विविधता,एकात्मता आणि आनंदाचा जल्लोष म्हणजे शिवाईनगर नवरात्रोत्सव होय. नऊ दिवसांत विविधक्षेत्रातील मान्यवर भेट देऊन देवीचे दर्शन घेतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उत्सवाला दरवर्षी भेट देत असतात


सौ.चंदना कैलास उतेकर
9920095596

Leave a Reply

Your email address will not be published.