fbpx

तिच्या मनाचा आणि शरीराच्या स्वच्छतेचा मंत्र

तिच्या मनाचा आणि शरीराच्या स्वच्छतेचा मंत्र

नम्रता देसाई

भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही. स्वतःच्या शरीराला कशाला हात लावायचा ना? ती तर पुरुषाच्या सुखाची गोष्ट! म्हणजे नवऱ्यासाठी राखायला स्तन कारण नवरा असेल तर मुल होणार आणि नवरा असेल तर शासकीय सामाजिक आर्थिक राजकीय वैचारिक अशा सगळ्या वर्तुळात अधिकारीक सत्ता मिळणार!
पण..
…………..
बाई ही एक माणूस आहे.
पाणी वापरून शरीर धुताना शरीराच्या प्रत्येक अवयवाला बोटांनी चोळलं पाहिजे. मग ती योनी असो की स्तन किंवा मनगट किंवा दंड किंवा पोटरी किंवा कंबर. हलका स्पर्श होऊन कातडीवर झालेला सहज स्पर्श तुम्हाला शरीरात होणारे बदल अनुभवण्यासाठी एकमेव उपाय असतो.
…………..
हो. शरीरावर साचलेला मातीचा थर धुण्यासाठी आपण साबण लावतो. दिवसभर काम केल्यावर आधीच्या काळात संध्याकाळी जेवणाआधी आंघोळ केली जायची. मग बनवलेलं जेवण धुनीवर तसंच गरम रहायचं ते वाढून द्यायचं आणि मग स्वयंपाक खोली आवरून जेवायला बसायचं. गप्पाटप्पा करत जेवून भांडी धुवून मग झाडलोट करून झोपायला जायचं. असा बाईच्या कामाचा तामझाम काही केल्या इथे संपायचा नाही. पोरं नवरा म्हातारेकोतारे सगळे जे सांगतील ते करत सगळे गप झाले की झोपायचं.
…………..
काळ बदलला. आपण तिथेच. बैठं किचन आता अत्याधुनिक झालं. पण प्रकार तोच.
…………..
आंघोळ करताना शरीरावर भसाभसा पाणी ओतून घ्यायचं, वाईच फेस बोटांवर घेऊन इथे तिथे लावायचा किंवा साबणाची कपळी तशीच भोवडून पाणी ओतलं की झाली आंघोळ. तसंच कापडानी अंग पुसल्यासारखं केलं की चड्डी, ब्रेसियर, परकर किंवा सलवार यात आवळून घ्यायचं. घामानी निथळून निघत तसाच गाऊन किंवा ड्रेस किंवा ब्लाऊज साडी नेसून पुढे काम सुरू.
………..
जितकं शरीर कोरडं तितकंच रोग दूर हे साधं गणित म्हणे. पण ते तर स्वप्नच.
…………..
मला लग्न करू म्हणून मागणी घालणाऱ्या नारंगने आता त्याच्या पुण्यातील कँपच्या घरात मोरी बनवताना कुठेही बंदिस्त मोरी ठेवली नाही. आजूबाजूला छत ठेवलं आहे. मोकळी हवा पाहिजेच. पावसापासून आडोसा करायला सोपं छत आहेच फळकुटाचं पण पाऊस नसेल तेव्हा तिथे बांबूचं जाळीदार छत राहिल अशी रचना केली आहे. का? कारण गरम पाण्याने घाम येऊन जो त्रास होतो त्याला मोकळी हवा हाच एकमेव पर्याय आहे. 😊
…………
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री अशा किमान चार वेळा शरीराचे वळकट्या असणारे सगळे भाग कोरड्या फडक्याने पुसून घेऊन नंतर ओलसर कापडाने किमान पुसता येईल अशी सोय तुम्ही दिवसभर असता अशा ठिकाणी आहे का? नसेल तर अशी जागा तयार करायला जमेल तितका संघर्ष करा.
कारण हे केलं नाही तर बुरशीजन्य त्वचेचे आजार, कातडं निघून जाऊन होणारे छोटे वाटणारे त्रास कायम मागे लागतील.
………..
आता म्हणाल याचा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसशी संबंध काय?
……….
मुळात शरीर कुठल्याही इन्फेक्शनपासून दूर असेल तर तुम्ही तिथे हात लावून पाहू शकता. रोज हात लागत असेल तर हलकीशी गाठ तयार होताना तुम्हाला जाणवेल. कुठल्याही आरोग्य केंद्रात १० रुपयात आजारांचं निदान करणारी शासकीय यंत्रणा शहर आणि गावात उपलब्ध आहे. जाऊन या.
………….
कॅन्सर गाठ कुठेही असू शकते.
योनीच्या बाजूला जांघेत किंवा योनीच्या आत कुठेतरी किंवा स्तनांच्या बाजूला कुठेही किंवा पोट मान किंवा अगदी कुठेही. साधा उठाव किंवा ठसठसत राहणं हेही अनावश्यक आहेच की. ती कॅन्सरची गाठ नसेलही. पण पुढे जाऊन गुंतागुंत वाढण्यापेक्षा किफायतशीर दरात निदान तर पाहून या.
………….
फक्त त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा नंतर तो रिपोर्ट आणि केसपेपरसह फॅमिली फिजिशियनला दाखवा. फिजिशियन सांगेल अशा डॉक्टरकडे किंवा तपासणी लॅबमध्ये जाऊन या. तुमचा वेळ जाऊन तपासणी निगेटिव्ह आली तर खूश व्हा. नाहीतर वेळीच निदान होऊन उपचार पूर्ण करा. ते वेळेत सुरू केल्यामुळे डॉक्टरला उपलब्ध पर्याय पाहून तुम्हाला योग्य ते उपचार द्यायला उसंत मिळते. आपल्याला काही कळत नाही हेच लक्षात घ्या. भलेही कितीही शिकलेले तज्ज्ञ डॉक्टर असोत ते रुग्ण म्हणून दाखल झाले तरी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारावर भरवसा ठेवून औषधं घेतात. पुन्हा त्याच डॉक्टरला दाखवून आपण पूर्ण बरे झाल्याचं लिखित मिळत नाही तोवर उपचार घेतले पाहिजेत. नंतर दर आठवडा पंधरवड्यात बोलवलं तरी जाऊन आलं पाहिजे.
……….
पेय किंवा खाद्य म्हणून कधीतरी अमली पदार्थ वापरत असाल तर ती एकदम थांबवू नका. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. अतिशय नियोजित पद्धतीने प्रमाण ठरवत शेवटचा टप्पा गाठा.
मी दारू पिते पण महिन्यात एखादा दिवस तीही एक ग्लास किंवा त्याहून कमी. पण त्याआधी व नंतर किमान दीड तास सलग चालते.
………..
रिचवण्याची क्षमता असलेलाच आहार घेतला पाहिजे. रोज एसीत बैठं काम करताना मासे भात खाल तर स्थूलता येणारच. त्याच जागी रोज उष्ण दमट हवामानात दिवसभर पायी चालून माहिती संकलन करून काम करत असाल तर बौद्धिक शारीरिक व मानसिक आरोग्य जपत आहार ठरवा.
……………..
निरोगी जगण्यासाठी दमल्यावर झोपणं, अंग न ठणकता उठणं, न थकता चालणं, उचकी न लागता सलग चार घोट पाणी पिता येणं आणि धाप न लागता किमान दहा पायऱ्या असलेले दोन मजले चढता येणं या गोष्टी व्यवस्थित करता येत असतील तर निरोगी जगण्याची निम्मी लढाई तुम्ही लढली.
……………..
बाकी फॅमिली फिजिशियन कुटुंबाला नसेल तर ती आजच्या काळात काळजी करण्याचे कारण आहे. तुम्ही कितीही वर्षांनी गेलात तरी तू काजू घेऊन आली नाहीस म्हणणारे फॅमिली डॉक्टर तुम्हाला आवश्यक असतात. पुण्यात बालगोपाळांपासून सगळ्या कुटुंबाला ओळखणारे माझ्या पूर्ण आजोळ व आताच्या घरापर्यंत सगळ्यांना ओळखणारे दोन डॉक्टर आहेत.
……………
गावी रहायला आल्यावर इथले डॉक्टरही बाबांचं घर आणि घरच्यांच्या hereditary बद्दल माहिती असणारे आहेत. त्यामुळे उपचार करण्यात सुलभता येते.
…………..
दात डोळे सर्दी ताप कान नाक घसा यावर उपचार करण्यासाठी शक्यतो माहिती असणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्या. मोठ्यात मोठे आजारांवर उपचारासाठी नेटवर्क मधले विश्वसनीय उपचार तज्ज्ञ यांची भेट ते सुलभरित्या घडवून आणतात. अमक्याच्या तमक्याला तमक्या तमक्या गोष्टीत अमकीचे उपचार गुणकारक ठरले होते याचा तुमच्या टिंब टिंब आजारात उपयोग शून्य असतो.
……………
त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचली तर उद्या आंघोळीला जाताना किमान दोन सुके कापड घेऊन आंघोळीला जाल. काय ब्याद आहे असं नाही. एकदा अंग नीट सुकवलं तरी ओलसरपणा लगेच धरतो. तेव्हा हवा येऊन शरीर सुकायला दोनच मिनिटे लागतात. तितका वेळ तुम्ही वाट पाहू शकताच.
मग सुकं कापड वापरून शरीर सुकवून मगच कपडे घाला. किमान त्वचा ज्ञान जागृत राहिल यासाठी तरी शरीराला हात लावा. तुमचंच अंग आहे! 😅

 

इमेज ग्राफिक Anant Khasbardar सरांनी काल लिहिलेली पोस्ट वाचून पाठवली आहे. ही त्यांनी डिझाईन केलेले ग्राफिक. धन्यवाद सर.

प्रतिक्रिया :

o     कल्पेश सुधाकर – योग्य आणि संतुलीत पोस्ट ✔ वेळेत उपचार घेण्यासाठी जायला पाहिजे असं वाटण्यासाठी हाच एक उपाय सुचला. 😊

o     विश्वास सुतार –  गरज आहे अजूनही अशा जनजागृतीची. संस्कृतीच्या पदराआड घुसमटत स्त्रिया खूप काही मुकाट सोसत कुटुंब पोसत राहतात आणि आम्ही समजतो आल इज वेल 😔 त्यासाठीच टोचणी लागेल असं बाया आणि पुरुषांनी लिहिलं पाहिजे. 😊

o     प्रवीण  लता  सुधाकर  बोडखे  – उत्तम पोस्ट आहे …यावर आधी माझा थोडा अभ्यास झाला पण बायकाच यातून बाहेर निघायला तयार नाही . ….अर्थात हे आमचे कौन्सिलिंग कमी पडते आहे असे वाटते. आपण सांगत रहायचं. बदल घडेल नक्की. 😊 मला विश्वास आहे.बदल घडायला पाहिजे नाही कोणासाठी पण आपल्या आरोग्यासाठी तरी … हीच माझी इच्छा आहे …येईल कधीतरी फळाला

o          हर्ष  डहाणूकर –  आमच्या हॉस्पिटल मध्ये आम्ही ब्रेस्ट कॅन्सर चा कॅम्प ठेवला होता, अगदीच चांगला नाही पण बरा रिस्पॉन्स मिळाला, त्यात 5 केसेस पॉझिटीव्ह आल्या, मी आमच्या घरातल्या बायांना नेहमी सांगतो, एकदा पूर्ण बॉडी चेकअप करत जा, नाहीतर सरळ लॅब वाल्याला बोलावून घेतो , पोस्ट खरंच खूप छान आहे, विचार करायला भाग पाडते, पुन्हा जर कधी कॅम्प अरेंज केला तर मी तुला नक्की सांगेल, कदाचित आता tb चा प्लॅन आहे, पण दिवाळी नंतर नक्की. मला जमेल तितके लिहित राहीन. वाचतील तितके किमान विचार तरी करू लागतील. माझं चुकलं तर त्यावरून का असेना चर्चा होईल. 😊

o     ज्योती  महाडिक –  बापरे 5 positive काय झालं असेल त्यांचे विचारही करवत नाही नशीब तुमच्या कॅम्प मुळे त्यांच्या लक्षात आले हे

o          काकासाहेब देसाई –  खूप छान

o          नितीन  जठार –  पोस्ट संतुलित आहे. किती महिला लाईक करतात ते महत्वाचं.

o          सुजाता  पोहेकर –  उत्तम

o          आदित्य  शिंदे –  चाळीशी नंतर प्रत्येक स्त्रीने pap smear आणि mamography दरवर्षी करून घेणं फार गरजेचं आहे.ह्याचं महत्व कधी कोण समजावून सांगतच नाही. अजूनही आपल्याकडे स्त्रियांच्या समस्या सांगण्यासाठी स्त्री डॉक्टरच लागते किंवा पुरुष डॉक्टर कडे त्या सांगितल्या जात नाहीत. हा माझा स्वतः चा अनुभव. समस्या सांगण्यात लाज ती कसली? किमान आठवड्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट examination करायला काय हरकत नसावी. पुना हॉस्पिटल कॅन्सर युनिटला डॉ. कटारे होत्या ना?

o          सुनील  जोशी –  अचूक आणि अतिशय योग्य.

o          दिलीप  कोरान्ने –  ही पोस्ट पुनः पोस्ट केलीस कां? अगदी परफेक्ट लिहिले आहेस नमुताई. अतिशय उदबोधक.

o          सायली  मिलिंद  महाराव –  सध्याच्या काळात ह्या लेथाची गरज आहे.

o          नितीन  गोलतकर –  नम्रता मस्तच चाकोरीच्या बाहेर येवून रोखठोक विचार येणे अतिशय गरजेचे …..

o          ज्योती  महाडिक –  नमू👌👌तुझ्यासाठी😘😘

o          रोहित  चित्तरंजन  भुतकर –  स्तनाचा कर्करोग जनजागृतीचा महिना विशेष. स्वताच आपल्या स्तनाच निरिक्षण करून वेळीच स्तनाचा कर्करोग ओळखणे शक्य जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, त्याचप्रमाणे वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कॅन्सरतज्ज्ञ तसेच तपासणीसाठी …

o          श्रीनिवास बाळकृष्णन – पोस्ट वाचायची इच्छा असूनही प्रचंड मोठ्या लांबीमुळे वाचू शकलो नाही

o          कल्पना  मोहाडीकर  तेंडुलकर –  Nice post

o          जाधव श्रीहरी नामदेव – स्त्रियांविषयी पुरुष जितक्या मोकळ्याने बोलतात तितकं त्याच बोलत नाहीत. पोस्ट खूप आवडली. सेव्ह करून ठेवतोय.

o          रोहित  शेलार –  दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिला एकत्र आल्या की साड्या आणि दागिने ह्या दोनच विषयावर जास्त बोलतात.

o          विजयकुमार  राऊत –  ब्रेस्ट कॅन्सरचे भयानक वास्तव, केमोथेरपी आदी संदर्भात माझ्या मित्राच्या आईच्या आजरपणावरून समजले. खरचं खूप छान आणि महितीवर्धक पोस्ट..👌

o          सुमित  राणे –  कुठल्याही कॅन्सर बाबत पूर्वकल्पना येत नाही. कारण अजून कारण संशोधकांना स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गाठ ओळखून उपचारासाठी जाणे हाच एकमेव पर्याय. 😊

o          रघुनाथराव  व्यवहारे –  अत्यंत उपयुक्त! thanks 🌹🌹

o          वृषाली  वजरीनकर –  Sollliddd

o          नीलम  शिवराम  चोरत – सुंदर ❤️

o          नितीन  अत्रे –  कॅन्सरच्या कुठल्या टेस्ट असतात. आणि त्या नेहमीच्या लॅबमध्ये होतात का

o          धनेश  कड  पाटील –  मी एका लेडी डॉक्टरकडे गेलो होतो तेंव्हा त्या डॉक्टरने सांगितलेल एक वाक्य कायमच मनात कोरलं गेलं “आपणच आपलं डॉक्टर व्हा”

आपण जर आजारी पडलो तर त्या लहान मोठ्या आजारावर उपचार करणे ह्याच काम डॉक्टर करतात पूर्व अनुभव आणि मिळालेली शिकवणी गाठीशी धरून पण किमान आजार होऊच नयेत यासाठी आपण किती सजग राहतो. आपण जागरूक राहायला पाहिजेच भूक लागली म्हणून जेवण करतो तस हे शरीर कोणत्या आजारानं बाधित होउ नये म्हणून त्या शरीराची शाररीक, मानसिक काळजी घ्यायलाच हवी, नम्रता अतिशय उत्तम प्रकारे लिहिलं आहेस….

o          गणेश  द  पुराणिक –  खूप सुंदर. ❤️

o          प्रसाद  करुळकर –  उपयुक्त आणि जागृत करणारी पोस्ट…✔

o          ऋतुपर्ण  पडतुरे –  खरच मस्त

o          संतोष  खामगावकर –  नम्रता, छान लिहीलंयस… प्रशंसनीय !!! धन्यवाद सर

o          गणेश  राऊतराय –  महत्त्वाचे मुद्दे मांडलेस नम्रता

o          राज  दादास  पाटील –  नम्रताजी…, वा ग्रेट..!!! आपण वास्तववादी सत्यता जगासमोर मांडली.. परखड विचारशैली समाजाला खूप काही शिकवून देते.

o          अर्चना  बापट –  वा चांगला विषय उत्तमप्रकारे हाताळला आहेस.. या प्रकारची जागृती अत्यावश्यक आहे

o          महारुद्र  मंगनाळे –  नेमकं… अर्थात हे जास्तीत जास्त स्त्रियांनी वाचायला हवं…मी पाठवतो

o          उषाकिरण  सम्राट –  खुपच गरज आहे हे समजुन सांगायची आणि तुम्ही रोखठोक बोलताय खरंच खुप छान

o          स्मिता  परांजपे –  खुपच उपयोगी माहिती

o          स्वाती  तेली –  खूपच सुंदर ….बाया आपल्या शरीराकडे खरंच लक्ष देत नाहीत…आरोग्याकडे तर पार दुर्लक्षच..बाईच शरीर हे खरंच पुरुषाचं सर्वस्व मानणाऱ्या स्त्रिया काही कमी नाहीत…रोख ठोक..खूप छान👌👌👌

o          किरण  घडी –  लिहित रहा.. क्रमश:

o          मच्छिन्द्र  गोजमे –  पण लक्षात कोण घेतो ?

o          अमोल  निवळकर –  खूप छान माहिती.

o          योगेश  खैरनार –  खूप भारी आणि रोखठोक लिहिलंय नम्रता जी.. 👌 अजून असेच लिखाण येऊ द्यात..

o          सुशील  राऊत –  खुपच गरज आहे हे समजुन सांगायची आणि तुम्ही रोखठोक बोलताय खरंच खुप छान

o          अश्विनी  गाडगीळ  वैद्य –  Very practical and perfect post ,thank you 🙏👌

o          प्रगती  सुरेंद्र  येलवे –  Nice

o          भारत  निलख –  तू खूप छान आणि सविस्तर लिहलंय. शरिराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होणं गरजेचं आहे. शरिराचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. नाक, कान, हात, पाय यांप्रमाणेच लैंगिक अवयवांकडे पाहता आलं पाहिजे. यासाठी प्रबोधन झालं पाहिजे. तुझ्यासारखीच्या प्रयत्नांमुळे नक्कीच परिस्थिती बदलायला मदत होणार आहे.

o          सुखदेव  गिरी –  नम्रता खुपच सुंदर, स्पष्ट आणि धाडसान तू लिहल आहेस, प्रत्येकांना हे रुचलच अस नाही परंतू जे मार्मिकपणे लिहल आहेस ते अनेकांना मोकळ व्हायला लावणार आहे. मुळात स्त्री आणि तिच्या शरीराची वर्णने फक्त पुरुष मानासिकता खुश करण्यासाठीच वापरतात का ? तु जे लिहल आहेस ते डोळयात अंजन घालणार आहे.मोकळेपणान आणि स्पष्टपणे मार्मिकपणे लिहित जा

o          धनराज कदम –  एकदम मार्मिक ताई मस्तच …💯✔

o          सुशील  वालम – जागरुकता खूप महत्त्वाची आहे. छान लिखाण नमु.

संकलन : नूतन भोईर
फेसबुक वॉल वरून साभार

 

Leave a Reply

Your email address will not be published.