fbpx

सांगसखी – संपादकीय मंडळ

रविंद्र मालुसरे

मुख्य संपादक

मी रवींद्र मालुसरे…. ‘सांगसखी’ या वेबपोर्टलचा मुख्य संपादक. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष, यापूर्वी दोन वेळा अध्यक्षपद-दोन वेळा प्रमुख कार्यवाह हे पद भूषविले आहे, मुंबई-पुणे-कोकणातल्या अनेक दैनिकातून सातत्याने लेखन केले. साई सहवास, अष्टमुद्रा दिपप्रभात या दिवाळी अंकाचे संपादक, तसेच पोलादपूर अस्मिता याअनियतकालिकाचे आणि वाचकांची चळवळ या वार्षिकाचे संपादक. मुंबईतील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींचा गेल्या तीन तपांचा साक्षीदार. माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत त्या “सांगसखी” वेबपोर्टलच्या माध्यमातून युनिकोड चा वापर करीत सत्यात उतरवायच्या आहेत, अनुभव व्यक्त करण्याकरिता यापुढे लेखणी बरोबरच की-बोर्डचा पुरेपूर वापर करणार आहे. वाचन, गप्पा, चर्चा, विचार, विनोद,लेखन, क्रिकेट,राजकारण,वारकरी साहित्य, मराठी अस्मिता, शिवछत्रपतींचा इतिहास….आणि बरेच काही जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे आणि आवडीचे विषय पूर्ण वेळ भारतीय, सामाजिक विषमता मिटवण्याचे स्वप्न.

भानुदास साटम

(उप संपादक )

मी व्यवसायाने IT professional आहे. गेली २० वर्षे IT क्षेत्रातट्रेनिंग, कन्सलटिंग, डेव्हलपमेंट करत आहे. वाचन, लिखाण याची आवडअसुन ललित, विनोद,कथा, कविता गेली १० वर्षे छंद म्हणुन लिहीत आहे. स्रियांची वैचारिक व सामाजिक उन्नती मध्ये हातभार लागावा या उद्देशाने सांगसखी मध्ये लेखक आणि डेव्हलपर म्हणुन सहभागी झालो आहे.

विजय नाग

(विशेष मार्गदर्शक,संवर्धक )

मी व्यवसायाने IT professional आहे. गेली २० वर्षे IT क्षेत्रात ट्रेनिंग, कन्सलटिंग, करत आहे. वाचनाची शालेय जीवनापासुन आवड आहे. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता आहे. स्त्रीयांच्या समस्या व तिची प्रगती या विषयी आत्मियत्ता असल्याने सांगसखी ची जोडला गेलेलो आहे. माझ्या अनुभवाच्या माध्यमातुन मी हे पोर्टल जगभर पोहचविण्याचा मानस आहे.

दत्ता मालप

( संपादक : क्रिएटिव्ह आर्ट )

जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधुन कमर्शियल आर्ट पदवी घेतल्या नंतर मुंबईतील अनेक मान्यवर Advertising Agency मध्ये काम केले आहे. त्यानंतर Pratyush Advertising च्या माध्यमातुन स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. रंगमितीच्या क्षेत्रातल्या माझ्या प्रतिभेची वाखाणणी गेली २५ वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन होत आहे. डिजीटल तंत्रज्ञानात डिझाईन केलेचा वापर अधिकाधिक माझ्या कडुन मुक्त हस्ते व्हावा यासाठी सांगसखी परिवारात सहभागी होत आहे.

शैलश इटले

संपादक - वेब डिझायनर

मी शैलेश संतोष इटले…. पदवीधर – बी ई कॉम्प्युटर सायन्स , Website designer and developer मध्ये विशेष प्राविण्य, वाचन व लेखनाची आवड, ‘सांगसखी’ वेबपोर्टलची तांत्रिक बाब सहजसुंदर आणि प्रेक्षणीय करण्याचा माझा सर्वोत्तम प्रयत्न असेल, आवडीच्या विषयावर लेखन,बदलत्या तंत्रज्ञाचा सतत मागोवा घेण्याची सवय. मी अनुभव घेत हे पोर्टल जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी वाचकापर्यंत पोहचविण्याचा मानस आहे.

निखिल मालुसरे

संपादक - मल्टिमीडिया क्रिएटिव्ह

मी, निखिल मालुसरे….. पदवीधर मुंबई विद्यापीठ- बी एम एम (ऍडव्हर्टाइसिंग ) पूर्ण वेळ ग्राफिक्स वेबडिझायनर, डिजिटल मीडिया मार्केटिंग, सांगसखी वेबपोर्टल तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम असणार आहेच तसेच विलोभनीय दिसावे यासाठी अद्ययावत ग्राफिक्सच्या तंत्राचा आणि माझ्या अनुभवाचा मी वापर करणार आहे, माझ्या नजरेसमोर अनेक नवनवीन कल्पना आहेत त्या सांग सखीच्या वेबपोर्टलवर आपल्या दृष्टीस पडेल. वाचन, प्रागतिक चर्चा, विचार-विनिमय, ललित लेखन, क्रिकेट, वारकरी संगीत, मराठी भाषेची चळवळ,अर्वाचीन इतिहास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय. साने गुरुजी शाळेत शिकल्यामुळे ‘खरा तो एकाची धर्म” ही प्रार्थना मनात खोलवर रुजली आहे.

प्रशांत भाटकर

संपादक - मनोरंजन व सांस्कृतिक

मी प्रशांत रमाकांत भाटकर… पदवीधर, आपलं महानगर या सायं दैनिकपासून पत्रकारितेला सुरुवात, त्यानंतर आज दिनांक, निर्भय पथिक यामध्ये पत्रकारिता. मुंबईतील दैनिकातून लेखन, रोखठोक आणि स्पष्ट बोलणारा म्हणून सर्वांना परिचित,play promotion, celebrity management, brand marketing, campaign design मध्ये विशेष रुची. cinemalover मराठी चित्रपट-नाटक व हिंदी सिनेमा पाहणे,पडद्यामागच्या घडामोडींचा वेध घेत त्यावर समीक्षा करणे हा अभ्यासाचा विषय. साईपूजा या माझ्या कंपनीखाली स्वतःच्या बनर्सखाली मधुर गाणी हा मराठी तर हिंदी चित्रपटांच्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम.

चंदना कैलास उतेकर

संपादक - मराठी भाषा व साहित्य

मी, सौ. चंदना कैलास उतेकर …… शिक्षण : डि.एड. बी.ए.(English and economic),प्राथमिक शिक्षिका – श्रीरंग विद्यालय प्राथमिक विभाग, ठाणे लेखनप्रवास -७-८ वर्षांपूर्वी शिक्षक दिनाचे भाषण कंटाळवाणे होऊ नये म्हणून पहिली कविता लिहीण्याची कल्पना सुचली. पुढे मराठी शाळा टिकाव्यात व मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी जनजागृती म्हणून मी कवीता लिहील्या आणि पुढे त्याला चांगली गती मिळाली व त्याचे अनेकांकडून कौतुक झाले याचे मला समाधान आहे. ‘मराठीचे शिलेदार’ कविता समूह तसेच ‘रानभूल’ कविता समूहामुळे आत्मविश्वास वाढला तसेच कविता लिहीण्याची प्रेरणा मला मिळाली.सांग सखीच्या माध्यमातून माझ्या लेखन प्रवासाला अधिक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या परिवारातील एक सदस्य म्हणून अनेक वाचन-लेखन करणाऱ्या सखीच्या बरोबर संवाद सांधणार आहे.