fbpx

चारोळी

राम आणि कृष्ण कथा सांगुन
मला जीवनाचा रस्ता दाखवते..
आता माझ्या मागं ये आज्जे
मी तुला शिकवते.
प्रवीण काडी 
—————
उभं आयुष्य जणू….
आज भरून पावलं…
इतरांंसाठी जगता जगता
माझ्यासाठी हे फुल उमललं…..
अनय प्रभू 
——————
तू माझी आजी
मी तुझी छकुली….
बनून तुझी सावली
साळेमंदी निघाली….
राणी शिंदे – 
——————– 
उलटली साठी ,
हातामंदी आली काठी 
सालला जाते नातीसंग 
घेऊन दप्तर पाटी
जयश्री सौंदत्तिकर
 
संसाररूपी रणांगणावर
मी लढाई लढते आहे
चार हातात संसार तर
चार हाती करिअर आहे..
ऋतुजा उमेश कुळकर्णी
———
दाही हात
दाही दिशा
अबला नारीची
तरीही दुर्दशा…
राणी शिंदे
—————-  
किती तरी आव्हान
दाही हाताने पेलते
तिरस्काराचा श्राप मात्र
निमुटपणे झेलते.
प्रविण कादी
———————– 
रोज नव्याने जन्मते ती,
नवनव्या आकाशी गवसणी घालते ती,
प्रपंचाचा गाडा हाकते ती,
दशदिशांना दशभुजांनी सत्ता गाजवते ती ……
अनय प्रभू. 
———————— 
 
माता तू शक्ती तू गृहणी तू
दहा कतृत्वाची स्वामिनी तू
ममता करूणा, प्रेम माया
दया भक्ती वास्तल्य जननी
कु. शि. जि
———— 
अष्टभुजा अष्टावधानि
21व्याशतकातली रणरागिणी
मायेचा पाझर तूच हिरकणी
विज्ञानयुगातील महाराणी
रेखा देशपांडे